राष्ट्रसंचार कनेक्ट

मळद ग्रा. पं. सरपंचपदी अ‍ॅड. भागवत बिनविरोध

कुरकुंभ : संपूर्ण गावचे लक्ष लागून असलेली मळद (ता. दौंड) गावची सरपंचपदाची निवड बुधवारी सकाळी पार पडली. यावेळी अ‍ॅड. मोहिनी बापूराव भागवत यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली.

सरपंच रेश्मा घागरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवडणूक घेण्यात आली. पंचायतीमध्ये ६/५ असे सत्ताधारी व विरोधी गटाचे बलाबल असल्याने सरपंचपदाची निवड चुरशीची होईल, अशी चर्चा गावात रंगली होती, मात्र मोहिनी भागवत आणि त्यांचे पती भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अॅड. बापूराव भागवत यांचा गावातील संपर्क आणि दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांचे निकटचे संबंध असल्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे दिसून येते. दुपारी दोन वाजता निवडणूक अधिकारी नेवसे यांनी भागवत यांचे नाव जाहीर केल्यानंतर ग्रामपंचायतीसमोर एकच जल्लोष झाला.

भागवत यांचे राहुल कुल यांच्याशी असणारे घनिष्ठ संबंध यामुळे गावच्या विकासाला चालना मिळेल, अशी चर्चा गावात दिसून आली. निवडणूक अधिकारी म्हणून महसूल मंडल अधिकारी एम. एन. नेवसे यांनी काम पाहिले. ग्रामसेविका कोमल खोमणे यांनी त्यांना सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये