प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मिडियावर कायमच चर्चेत असते. ४८ वर्षे वय असूनही ती तिच्या फिटनेससाठी आणि तिच्या फॅशन स्टाईलसाठी इतर तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. नुकतीच ती famina misss India finele मध्ये सहभागी झालेली होती. यावेळीही तिने घातलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले होते. तिने कार्यक्रमात ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. मात्र ट्रान्सपरंट ड्रेस घालण्याची चूक तिला महागात पडल्याचं दिसत आहे.
famina misss India finele मध्ये मालायकाने सोनेरी रंगाचा ड्रेस घातला होता. मात्र तो पारदर्शक होता. यावेळी मलायकाच्या मेकअपची देखील चर्चा झाली. तिने केलेल्या मेकअप वरती तिचा ट्रान्सपरंट ड्रेस एकदम झक्कास दिसत होता. मलायकानं लाईट मेकअप केला होता. आणि केसही मोकळे सोडले होते त्यामुळं ती प्रत्येकवेळी पेक्षा खूपच सुंदर दिसत होती. त्या लूक मधील तिचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. मात्र चाहत्यांकडून ट्रोल देखील होत आहे.
तिच्या गोल्डन ट्रान्सपरंट ड्रेस मधील लूक मुळे कार्यक्रमातील सर्वांच लक्ष तिच्याकडे वेधलं होतं. सोशल मिडीयावर चाहत्यांकडून तिचं कौतुक केलं जात असताना अनेकांनी तिचा लूक आवडला नसल्यानं तिच्या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आल्या. अनेकांनी कॉमेंट मध्ये तिला ‘म्हातारी’ आणि ‘स्वस्तातली केंडर जेनर’ म्हटलं आहे. त्यामुळं तिचा गोल्डन ट्रान्सपरंट ड्रेस मधला लुक अनेकांना आवडला नसल्याचं दिसत आहे.