ताज्या बातम्यामनोरंजन

एल्विश यादव प्रकरणात मानसी नाईकचा संबंध? पूर्वाश्रमीचा पती बघा काय म्हणाला…

Elvish Yadav Rave Party Case : बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) याला रेव्ह पार्टीमध्ये (Rave Party) सापाचं विष आणि परदेशी तरुणींचा पुरवठा केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात आता मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) हिचा पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेरा (Pardeep Kharera) याचाही संबंध असल्याचं बोललं जातंय. एल्विशच्या टीव्हीवर दाखवण्यात आलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रदीप स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे “तू सुद्धा या प्रकरणात सामील आहेस का?” अशाप्रकारचे अनेक प्रश्न त्याला नेटकऱ्यांकडून सातत्याने विचारले जात होते. यावर आता प्रदीपने व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलेलं आहे.

https://www.instagram.com/reel/CzOlCJ4v8GE/?utm_source=ig_web_copy_link

प्रदीप (Pardeep Kharera) या व्हिडीओमध्ये म्हणतो, नमस्कार मित्रांनो! एल्विशबद्दल (Elvish Yadav) अलीकडे ज्या बातम्या व्हायरल होत आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, कृपया या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. खोट्या प्रकरणात एल्विशचं नाव पुढे करण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. आमच्या दोघांचे एकत्र व्हिडीओ पाहून अनेकांनी मला व माझ्या कुटुंबीयांना फोन करून याबद्दल चौकशी केली. पण, मी हेच सांगेन की, आम्हाला चुकीच्या पद्धतीने यात अडकवण्यात येत आहे.

“माझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. काही गोष्टी नकारात्मकतेने पसरवल्या जात आहेत. आम्ही सगळी मुलं एका गाण्याच्या शूटिंगसाठी जमलो असतानाचे हे सगळे व्हिडीओ आहेत. हा व्हायरल व्हिडीओ गाण्याचा एक भाग होता. पण, हे गाणं आम्ही सहा महिन्यांपूर्वी शूट केलं होतं. आम्ही सापांची तस्करी वगैरे केलेली नाही.” असं स्पष्टीकरण देत प्रदीप खरेराने काही व्हायरल व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी त्याच्या स्पष्टीकरणाचं समर्थन केलं असून, अनेकांनी प्रदीपचं स्पष्टीकरण खोटं असल्याचा दावा केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये