मेहंदी है रचने वाली… स्त्रियांमध्ये मंडला मेहंदीची क्रेझ

अनेक स्त्रियांना हातावर मेंदी काढायला खूप आवडते. कोणताही सण असो, कार्यक्रम असो, लग्नसोहळा असो; मेंदी आवर्जून काढतातच. मेंदीचे अनेक प्रकार असले, तरी सध्या अलीकडच्या काळात मंडला मेंदीची क्रेझ आहे.
वेगवेगळ्या डिझाईन्स्च्या मेंदी स्त्रिया काढतात. पण सध्या ब्रायडल आणि अरेबिक मेंदी सोबत मंडला आर्ट मेंदी चांगलीच ट्रेंडिंगमध्ये आहे. मंडला मेंदीला स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. अत्यंत हलकी डिझाईन असणारी ही मेंदी हातावर खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. तसंच बहुतेक स्त्रियांना ब्रायडल मेंदी काढण्याचा खूप कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही मंडला मेंदीच्या डिझाईन काढू शकता. मंडला मेंदी तुम्ही हातावर आणि पायावर दोन्ही ठिकाणी काढू शकता. ही मेंदी रंगल्यानंतर आणखीनच सुंदर दिसते.
लोटस मंडला मेंदी – लोटस मंडला आर्ट मेंदी हातावर खूपच सुंदर दिसते. यामध्ये कमळाचे डिझाईन मेंदीचे सौंदर्य वाढवते. तसेच अनेक लग्नसोहळ्यांत वधूच्या हातावर लोटस मंडला डिझाईन पाहण्यात आले आहे. आपणही ही डिझाईन ट्राय करू शकता. तसेच बाजारात मंडला मेहंदी डिझाईनचे पुस्तक देखील उपलब्ध आहे. त्यातून तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स पाहून तुमच्या हातावर काढू शकता.

भरीव मंडला मेंदी – लग्नसमारंभामध्ये नवरीच्या हातावर भरीव मेंदी काढावी लागते. अशावेळी तुम्ही मंडला आर्टमध्ये भरीव डिझाईन निवडू शकता. या मंडला आर्टने तुम्ही तुमचा पूर्ण हात भरू शकता. हेवी मंडला आर्ट काढायला सोपे असते आणि ते पटकन काढून पूर्ण होते. हेवी मंडला आर्ट डिझाईनने नवरीचा हात भरलेला दिसतो. यामध्ये तुम्ही लाईन्स, डॉटची मंडला मेंदी काढू शकता. तसेच इतरही अनेक प्रकारची डिझाईन काढू शकता. या डिझाईन्स काढल्यानंतर खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात.

बटरफ्लाय मंडला मेंदी – अनेक जणींनी बटरफ्लाय अर्थात फुलपाखराची डिझाईन असलेल्या मंडला मेंदीला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली आहे. ही मेंदी हातावर खूप सुंदर दिसते. तसेच अशा पद्धतीची मेंदी काढताना तुम्ही तुमच्या बोटांवर सुंदर अशी फुलपाखरे काढू शकता, जी लक्ष वेधून घेतात. जर तुम्ही बटरफ्लाय ब्रायडल मंडला मेंदी काढणार असाल, तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराचे नाव काढू शकता, ते दिसायला खूप सुंदर दिसते.
