पुणे
मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी ईडीने मोठी कारवाई केली असून मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आली आहे. काल सकाळपासून बांदल यांच्या घरी ईडीची चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अटकनेनंतर बांदल यांना मुंबईला नेण्यात आले आहे. आज दुपारी बांदल यांना मुंबई कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी मंगलदास बांदल यांना रात्री साडेअकरा वाजता ईडीकडून अटक करण्यात आली आहे. बांदल यांच्या दोन्ही निवासस्थानी ५ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम आढळून आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. तर पाच आलिशान गाड्या आणि एक कोटी किंमतीची चार मनगटी घड्याळेही आढळून आली आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांची 16 तासाहून अधिक वेळ ही कारवाई चालू होती.