ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“गरीबांचं रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला, त्यामुळे तुमच्यावर…”, मनोज जरांगेंचा भुजबळांवर घणाघात

जालना | Manoj Jarange Patil – मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज भव्य सभा पार पडली. जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली येथे त्यांची सभा पार पडली. या सभेला लाखोंच्या संख्येनं मराठा समुदाय उपस्थित राहिला होता. या सभेत मनोज जरांगेंनी राज्य सरकारकडे आरक्षण देण्याची मागणी केली. तसंच यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधला.

छगन भुजबळ यांनी आंतरवाली येथील सभेसाठी 7 कोटी रूपये खर्च केल्याचा आरोप केला होता. या आरोपावर आता मनोज जरांगेंनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी जरांगेंनी भुजबळांवर टीका करत सभेच्या खर्चाच्या पैशांचा हिशोबही दिला.

यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही असं म्हणणारे छगन भुजबळ आता विरोधात बोलत आहेत. आता ते फडफड करत आहेत. या सभेसाठी सात कोटी खर्च केल्याचं भुजबळ म्हणाले. पण या सभेसाठी शेतकऱ्यानं शंभर एकर जमीन फुकट दिली आहे, इथे येऊन विचारा.

छगन भुजबळ म्हणतात लोकं दहा रूपये देत नाही. लोकं त्यांना देत नसतील पण आम्हाला देतात आणि तुम्हाला पैसे का देत नाहीत हे मी सांगतो. तुम्हाला गोरगरीब मराठा जनतेनं मोठं केलं. त्यांचं रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला, त्यामुळे तुमच्यावर धाड पडली. तुम्ही जनतेचे पैसे खाल्ले, दोन वर्ष आतून बेसन खाऊन आले अन् ते आम्हाला शिकवतात, असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर टीका केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये