देश - विदेश
मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल!
धाराशिव : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीपान कोकाटे आणि आप्पासाहेब देशमुख यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश असूनही सभेचे आयोजन करण्यात आल्याने या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील बातमी दिली आहे.
मराठा समूदायाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेत आहेत. त्यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला असून त्याआधी ते वातावरण निर्मिती करत आहेत.
धाराशिवमध्ये त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जमावबंदी असताना ही सभा आयोजित केल्याचा आरोप करत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय.