Railway Megablock : पुणेकरांनो रविवारी लोकलने प्रवास करत असाल तर ही बातमी वाचा! मेगाब्लॉकमुळे अनेक लोकल रद्द
Sunday railway mega block between Pune and Lonavla : पुणे शहर परिसरातील रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी. पुण्यामध्ये येत्या रविवारी (१० डिसेंबर) पुणे-लोणावळा-पुणे सेक्शन दरम्यान हा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या मेगा ब्लॉकमुळे पुणे रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहे तर काही गाड्यांची वेळ बदलली आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. जाणून घ्या सविस्तर.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
रविवार (१० डिसेंबर) पुणे- तळेगाव -लोनावला -पुणे दरम्यान धावणाऱ्या अपच्या दिशेने लोकल गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.
०१५६२ पुणे /९.५७ लोणावळा ११.२२, ०१५६४ पुणे/ ११:१७ – लोणावळा/१२:३७, ०१५६६ पुणे/ ५.०० लोणावळा/०६:२०, ०१५८८ शिवाजीनगर/ ०५:४७ – तळेगाव/ ६:३२, ०१५६८ पुणे/ ५:२५- लोणावळा ५:४५, ०१५७० शिवाजीनगर/०५:२०- लोणावळा/ ६:३८, ०१५७२ पुणे/ ०६:०२- लोणावळा/०७:२७
रविवार पुणे- तळेगाव -लोनावला -पुणे दरम्यान धावणाऱ्या डाउनच्या दिशेने खालीलप्रमाणे लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत.
१. ०१५५९ लोणावळा / १०:०५ – शिवाजीनगर / ११:२५
२. ०१५६१ लोणावळा / ०२:५० – पुणे /०४:१०
३. ०१५६९ तळेगाव / ०४:४० – पुणे /०५:३२
४. ०१५६५ लोणावळा / ०५:३० – शिवाजीनगर / ०६:०८
५. ०१५६७ लोणावळा / ०६:०८- शिवाजीनगर ०७:४०
६. -१५६९ लोणावळा / ७:००- पुणे / ८:३२