देश - विदेश

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला; २ जवान शहीद

त्तीसगडच्या (Chhattisgarh) सुकमा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्याती सिल्गर आणि टेकुलगुडम दरम्यान माओवाद्यांनी (Naxal) मोठा आयईडी स्फोट केलाय. या स्फोटात दोन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जवान यात जखमी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  एकीकडे सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी (Anti-Naxalite Campaign) अभियानाला मोठे यश मिळाले असताना, दुसरीकडे माओवाद्यांनी जवानांच्या ट्रकला लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. नक्षलविरोधी (Anti-Naxalite Campaign) अभियानावर असलेल्या सुरक्षा राक्षकांवर हा हल्ला करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

हेही वाचा- “मोदी सरकारचं लीकतंत्र तरुणांसाठी घातक”; युजीसी नेट परीक्षेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल

२०१ कोब्रा वाहिनीची ऍडव्हान्स पार्टी जागरगुंडा पोलीस स्टेशन हद्दीतील कॅम्प सिल्गर येथून आरओपी ड्युटी दरम्यान ट्रक आणि मोटारसायकलने कॅम्प टेकलगुडेमकडे जात होती. दरम्यान सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर आयईडी पेरला होता. दरम्यान,आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास २०१ कोब्रा कॉर्प्सच्या एक ट्रकवर आयईडी स्पोट घडवून आणला. ज्यामध्ये चालक आणि सहचालक जागीच शहीद झाले असून उर्वरित सर्व जवान सुरक्षित असल्याची माहिती आहे. यात  शहीद जवानांची नावे  विष्णू आर आणि  शैलेंद्र अशी सांगण्यात येत आहेत. शहीद जवानांचे पार्थिव सध्या घटनास्थळावरून बाहेर काढण्यात येत आहे. मात्र या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- उद्यापासून संसदेचे अधिवेशन होणार सुरू ; पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी २८० खासदारांसह घेणार शपथ

माओवादी बनवत होते चक्क बनावट नोटा

दरम्यान, नुकतेच सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या  नक्षलविरोधी (Anti-Naxalite Campaign) अभियानाला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान, छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चौहान यांनी प्रथमच या बाबत मोठा खुलासा केला आहे. सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानांतर्गत माओवादी चक्क बनावट नोटा बनवत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये बनावट नोटा बनवण्याचे साहित्य प्रथमच जप्त करण्यात आले. या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली असून हे मोठं यश पोलिसांना मिळाले आहे. परिणामी आता माओवादी संघटना आर्थिक संकटात संपडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये