गोपीचंद पडळकरांवर मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक, ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर घडली घटना
बारामती : (Maratha Andolak On Gopichand Padalkar) इंदापुरात (Indapur) गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) चप्पलफेक करण्यात आलीये. ओबीसी (OBC) एल्गार मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी मराठा (Maratha) समाजाविरोधात भाषण केल्यामुळे इंदापुरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळंत आहे. या आवेगाच्या भरात काही आंदोलकांकडून चप्पलफेक करण्यात आली आहे.
ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर गोपीचंद पडळकर हे मराठा साखळी उपोषणाजवळ आले. त्यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला. ज्या ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावा होता त्या ठिकाणावर काही फुटावरती मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे.
इंदापुरात अण्णा काटे यांच्या वतीने आमरण उपोषण सुरु आहे. त्या उपोषणाला भेट देण्यासाठी पडळकर गेले असल्याची माहिती समोर आली होती. पण तिथेच दुधासाठी देखील उपोषण सुरु होते. त्यामुळे पडळकर नक्की कोणत्या उपोषणासाठी आले होते, याबाबत मात्र अद्याप संभ्रम आहे.
ओबीसी एल्गार मेळाव्यातून पडळकरांचा हल्लाबोल
ओबीसीच्या हिताच्या आड कोणी येत असेल तर त्याला आडवा करायची तयारी ठेवली पाहिजे. आज सरसकट कुणबी दाखले देणे सुरू केलं आहे. अनेक जातीच्या लोकांना अनेक हेलपाटे घातले तरी आम्हाला पुरावे मागत आहेत. भुजबळ साहेबांच्या डोक्याचा केस कोणी वाकडा करु शकत नाही, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी हल्लाबोल केला होता.