Maratha Kranti Morcha: ‘तो’ व्हायरल मेसेज अन् मुंबईत मराठा क्रांती मोर्चाला सुरूवात; पोलिसांचा कडक बंदोबस्त
मुंबई | Maratha Kranti Morcha – आज (12 ऑक्टोबर) सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला होता. मुंबईमध्ये (Mumbai) मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीनं आंदोलन केलं जाणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर आता हा मेसेज खरा ठरला आहे. मराठा आंदोलक गिरगाव चौपाटीवर एकत्र आले असून त्यांनी मोर्चाला सुरूवात केली आहे.
या मोर्चाला गिरगाव चौपाटीपासून सुरूवात झाली आहे. तर हा मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याकडे कूच करत आहे. त्यामुळे वर्षा बंगल्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
मुंबईत आज मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र तर्फे धडक मोर्चा काढण्यात आला आहे. त्यामुळे हा मोर्चा थेट मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्याकडे कूच करत आहे. तर गिरगाव चौपाटीहून निघालेला हा मोर्चा वर्षा बंगल्यावर जाणार आहे. त्यामुळे सध्या तेथील वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे.