अजित पवार गटाच्या आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची दगडफेक; बंगल्याच्या आवारातील गाड्याही जाळल्या
बीड | Prakash Solanke : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आंदोलकांनी दगडफेक केली आणि त्यांच्या बंगल्याच्या आवारातील गाड्याही जाळल्या आहेत. त्यामुळे सोळंकेंच्या बंगल्यामधून धुराचे लोळ येताना दिसत आहेत.
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल हिनवणी करणारं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याची कथीत ऑडिओ क्लीप समोर आली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी सोळंकेंच्या बंगल्यावर दगडफेक, जाळपोळ करण्यास सुरूवात केली आहे.
प्रकाश सोळंकेंच्या घरात हजारो नागरिकांचा मॉब घुसला असून ते दगडफेक करत आहेत. तसंच त्यांनी वाहनांची जाळपोळ केली असून बंगल्याची तोडफोड केली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.