ताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे का? हिंगोलीत विजेच्या तारांना पकडून तरूणाची आत्महत्या

हिगोली | Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच मराठा आरक्षणासाठी अनेक तरूणांनी आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे आत्महत्यांचं सत्र अजूनही थांबलेलं नाहीये. आता हिंगोली (Hingoli) जिल्यातील एका तरूणानं विजेच्या तारांना पकडून आपलं जीवन संपवलं आहे.

आदिनाथ राखोंडे (वय 27) असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. आदिनाथनं मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे हे टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याच्या आत्महत्येनंतर हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

आदिनाथ राखोंडे हा उच्चशिक्षित होता. त्याचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभाग होता. तसंच उच्चशिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नसल्यामुळे तो चिंतेत होता. त्यामुळे त्यानं विजेच्या तारांना स्पर्श करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं एक चिठ्ठी देखील लिहिली आहे.

चिठ्ठीमध्ये त्यानं लिहिलं आहे की, एक मराठा लाख मराठा..मी सतत बातम्या पाहत आहे व मला असं वाटत आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझं उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे का? मी हतबल होऊन आज रात्री माझं जीवन संपवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये