Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या
जालना | Maratha Reservation – आज (14 ऑक्टोबर) जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची सभा पार पडत आहे. त्यांच्या या भव्य सभेसाठी लाखोंच्या संख्येनं मराठ्यांनी गर्दी केल्याचं दिसत आहे. तर मनोज जरांगेंनी समाजाशी संवाद साधताना राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहे.
मनोज जरांगेंनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. तर आज 30 दिवस पूर्ण झाले असून मनोज जरांगेंनी सरकारकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत.
– कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्यात यावी.
– मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन प्रत्येक मराठ्याचा ओबीसीमध्ये समावेश करावा.
– मराठा समाजाला सरकारनं 10 दिवसांत आरक्षण द्यावं.
– मराठा समाजासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी द्यावा आणि त्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी द्यावी.
– ओबीसी आरक्षण दिलेल्या बांधवांचा दर 10 वर्षाला सर्व्हे करण्यात यावा.
– राज्यातील मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या.