क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जाळपोळीची घटना अतिरेक्यांनाही लाजवणारी; मास्टरमाईंड कोण? क्षीरसागर यांचा सवाल

बीड : मराठा आंदोलनात झालेल्या (Maratha Reservation Protest) (Beed) जाळपोळीने संपुर्ण महाराष्ट्र हदरला होता. यावेळी आमदार संदिप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरांना लक्ष करण्यात आलं. हि जाळपोळ एक षडयंत्र असून या षडयंत्राचा मास्टरमाईंड कोण हे तपासा, अशी मागणी माजी मंत्री आणि ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी केली आहे.

हातामध्ये दगड, काट्या आणि ज्वलनशील पदार्थ घरावर पेटवून दंगा करणारे हे तरुण 25 वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे यातील बरेच तरुण हे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात आहेत. बीड शहरातील जाळपोळ प्रकरणी आतापर्यंत 120 जणांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामध्ये पाच अल्पवयीन मुले सुद्धा आहेत.

जमावाचा उद्देश जीवाताला धोका पोहोचवण्याचा, जयदत्त क्षीरसागरांचा आरोप
बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी देखील मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आणि यावर जयदत्त क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अतिरेक्यांनाही लाजवणारा हा प्रकार असल्याचे सांगत ब्रिटिश आणि निजामाच्या काळात देखील अशा घटना घडल्या नाहीत. त्यामुळे या घटनेमध्ये मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिसांनी लावावा. त्याचबरोबर जमावाचा उद्देश फक्त जाळपोळ करण्याचा होता की कोणाच्या जीविताला धोका पोहोचवण्याचा होता असा देखील प्रश्न जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये