साजिद खानवर ‘या’ मराठी अभिनेत्रीनं केला गंभीर आरोप; म्हणाली, “त्यानं मला त्याच्या ऑफीसमध्ये बोलावलं अन्…”

मुंबई | Sajid Khan – बाॅलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) सध्या ‘बिग बाॅसमुळे’ (Bigg Boss) चांगलाच चर्चेत आहे. साजिद खान बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यापासून त्याच्यावर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. तसंच त्याला बिग बाॅसच्या घरातून बाहेर काढण्याची देखील मागणी केली जात आहे. अशातच आता पुन्हा एकदा साजिदवर एका मराठी अभिनेत्रीनं गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
साजिद खानवर मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाडनं (Jayshree Gaikwad) लैंगिक छळाचा आरोप केला आहे. जयश्रीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “आठ वर्षांपूर्वी एका लोकप्रिय कास्टिंग दिग्दर्शकानं मला एका पार्टीत नेलं होतं. त्यावेळी माझी सादिज खानशी भेट झाली. त्याला भेटून अर्थात मला आनंद झाला.”
पुढे ती म्हणाली, “त्यानंतर लगेचच साजिदनं दुसऱ्या दिवशी मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं. तो म्हणाला, तो एक सिनेमा बनवत असून त्यात मी मुख्य भूमिकेत असेन. ऑफिसमध्ये एन्ट्री केल्यापासून साजिद मला स्पर्श करत होता. तसंच अश्लील कमेंट देखील करत होता. त्यावेळी साजिद मला म्हणाला, फक्त अभिनय करून चालत नाही. मी सांगतो ते तुला करावं लागेल. त्यावेळी मी रागानं त्याच्या ऑफिसमधून निघून गेले.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री-माॅडेल शर्लिन चोप्रानं (Sharline Chopra) साजिद खानवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. तसंच डिंपल पॉल, आहाना कुमरा, मंदाना करीमी, दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि सिमरन सुरी अशा अनेक अभिनेत्रींनी देखील त्याच्यावर आरोप केले होते.