ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

चिंताजनक! मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

छत्रपती संभाजीनगर : (Marathwada Rain Update) मराठवाड्यात (Marathwada) शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली असतानाच, आज दुसऱ्या दिवशीही विभागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट देखील पाहायला मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) करंजखेड आणि पिशोर परिसरात गारपीट पाहायला मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरसह लातूर, हिंगोलीसह परभणी जिल्ह्यात देखील आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान सोयगाव आणि अजिंठा लेणी परिसरात जोरदार पावसासह गारपीट झाली होती. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. करंजखेड आणि पिशोर परिसरात जोरदार पावसासह सोसाट्याचा वारा आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे पीकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. तर फळबागांना देखील याचा फटका बसला आहे.

हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसासह मोठ्याप्रमाणामध्ये गारपीट झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी, गहू, हरभरा, टरबूज आणि खरबूज यासह आंब्याच्या बागा असलेल्या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाला आहे. शेतातील गहू, ज्वारी, टरबूज यासह हरभरा हे पिके आता काढणीला आली होती. परंतु जोरदार झालेल्या गारपिटीमुळे शेतातील या पीकांना फटका बसला आहे.

अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याचे चित्र असून, आज सलग तिसऱ्या दिवशी परभणीत अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळाला आहे. आज दुपारी दोन वाजेनंतर परभणी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पुर्णा, सेलु तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झालाय. तर गंगाखेड, सेलु, सोनपेठ तालुक्यात गारपीट झाल्याने काढलेले आणि काढणीसाठी आलेल्या गहू, ज्वारी या पिकांसह टरबूज, खरबूज, आंबा, मोसंबी आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागच्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खरिपांनंतर रब्बीतही मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता सरकारी मदतीकडे लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये