शिवसेना बंडखोर आमदारांची मज्जा; तर दुसरीकडे उपाशीपोटी जनता

नवी दिल्ली : गुवाहाटी ही आसामची राजधानी असून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झालेली आहे. २० तारखेला विधानपरिषद निवडणूक पार पडली त्या रात्रीपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह सुरत गाठलं आणि शिवसेनेला जोरदार धक्का बसला. एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांनी केलेला बंड महाविकास आघडीला सत्ता परिवर्तनाकडे घेऊन जाणार आहे. त्यानंतर सुरतहुन शिंदे गट असाममधील गुवाहाटी येथील पंचतारांकीत हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये राहत आहेत. तर दुसरीकडे आसामचे हजारो लोक पूरामुळे बेघर झालेले आहेत.
प्रचंड पाऊस आणि जनतेला खायला अन्न नाही.तर शिवसेनेचे बंडखोर आमदार शाही मेजवाणी झोडत आहेत.
बंडखोर आमदार ज्या हॉटेलमध्ये राहिले आहेत. त्यात तब्ब्ल १९६ खोल्या असून ७० खोल्यामध्ये हे आमदार राहत असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व राजकीय वातावरण आणि पोलीस बंदोबस्त बघता हॉटेल मालक सुद्धा दुसऱ्या राहिलेल्या खोल्यासाठी बुकिंगही घेत नाही. हॉटेलमध्ये ७ दिवसांसाठी भाडे ५६ लाख रुपये एवढे आहे. तर एवढ्या आमदारांना दिवसाला जवळपास आठ लाख रुपयांचे जेवण आणि अन्य सेवा लागत असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना आमदारांसाठी हे हॉटेल सात दिवसांसाठी बुक करण्यात आले आहे. यावर जवळपास १.१२ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
दरम्यान, सर्व परिस्तिथिचा आढावा घेत आसामच्या कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यातून बंडखोर आमदारांना आसाम सोडण्याचा इशारा दिला आहे. तसंच गुवाहाटीत सुरुची असलेलं महाराष्ट्रातील बंडाचा राजकारण आसाममधील जनतेवर परिणाम करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. आसाम हे नैतिकता जपणारा राज्य असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. शिवसेना आमदार अशा प्रकारे करोडो रुपये खर्च करत असल्याने पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा काही पैसा पूरग्रस्तांना देण्याची मागणी देखील तेथिल जनता करत आहे.