क्राईमताज्या बातम्यादेश - विदेश
पाकिस्तानातील पेशावरमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट; १७ जणांचा मृत्यू तर ८० जण जखमी

पेशावर : Massive Bomb Blast In Pakistan’s Peshawar 7 died 70 Injured पाकिस्तानमध्ये आज दुपारी (सोमवार) मोठा बॉम्बस्फोट घडला आहे. पाकिस्तानातील पेशावर मधील एका मशिदीत बॉम्बस्फोट (Bomb Blast In pakistan Peshawar in The Mosque) घडल्याने पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात तब्बल १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर जवळपास ८० जण जखमी झाले आहेत. जुहरच्या नमाजनंतर दुपारी ०१.०० वाजण्याच्या सुमारास शहरातील पोलीस लाईन्स परिसराजवळ हा स्फोट झाला.
या स्फोटात मशिदीची एक भिंत कोसळल्याची माहिती आहे. या स्फोटामागील कारस्थान अजून कळलेले नाही.