इतरक्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur News: सोलापूरात MD ड्रग्स बनवणाऱ्या फॅक्ट्रीचा पर्दाफाश; 16 कोटींचं ड्रग्स जप्त

सोलापूर | Solapur News : सोलापुरातील (Solapur) एका कंपनीमध्ये एमडी ड्रग्स (MD Drugs) बनवले जात होते. तर मुंंबई गुन्हे शाखेनं (Mumbai Crime Branch) या ड्रग्स बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई गुन्हे शाखेनं या कंपनीतील तब्बल सोळा कोटींचं ड्रग्स जप्त केलं आहे. तसंच संबंधित कंपनी गुन्हे शाखेच्या पथकानं सील केली आहे.

सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसीमधील एका बंद पडलेल्या कंपनीमधून ड्रग्सचा गोरख धंदा केला जात होता. तर मुंबईच्या गुन्हे शाखेला याबाबतची माहिती मिळाली होती. त्यामुळे मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून संबंधित कंपनीवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये जवळपास आठ किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.

मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली. त्यानंतर तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, 2016 साली देखील सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी परिसारातील एका कंपनीत अशाच पद्धतीनं ड्रग्सचा धंदा केला जात होता. त्यावेळीही ठाणे गुन्हे शाखेनं कारवाई करत ड्रग्सचा पर्दाफाश केला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये