ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

येरवडा जमीन विक्रीसाठी दबाव! अजित पवारांवरील आरोपांवर बोरवणकर यांनी आता स्पष्टच सांगितलं

नवी दिल्ली : (Meera Borwankar On Ajit Pawar) माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे मागील दोन दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यानंतर अजित पवार यांनी हे सर्व आरोप खोडून काढले.

दरम्यान, सोमवार दि. 16 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बोरवणकर म्हणाल्या की, पुस्तकात 38 प्रकरणे आहेत. यामध्ये एकतर्फी प्रेमात तरुणीची झालेली हत्या, जळगाव सेक्स स्कँडल, मानवी तस्करी अशी विविध प्रकरणे या पुस्तकात आहेत. एकाच प्रकरणाबद्दल मला विचारणा करू नका. एकाच प्रकरणाबद्दल त्याला संकुचित करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. हे पुस्तक प्रशासन, उत्कृष्ट तपास, मुली-महिलांचे शोषण अशा विविध मुद्यांवर आहे. हे पुस्तक सगळ्यांनी विशेषत: मुलींनी, महिलांनी वाचावे, असेही बोरवणकर यांनी म्हटले.

मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्या प्रकरणाबाबत म्हटले की, अजित पवार यांनी लिलाव केला नाही, हे सत्य आहे. पुणे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीच्या लिलावासाठी सरकारने एक समिती नेमली होती. त्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली. माझ्याकडे कार्यभार असल्याने ही जमिनीवरील ताबा सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती. अजित पवारांनीदेखील हाच आग्रह धरला होता. लिलाव झाल्याने आता हस्तांतरण प्रक्रिया सुरू करा असे त्यांनी म्हटले. मात्र, माझ्या दृष्टीने ती जागा महत्त्वाची होती. पुणे पोलीस आयुक्तालय, पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी ही जागा वापरता आली असती. त्यामुळे मी त्या तीन एकर जमिनीच्या लिलावाला आक्षेप घेत हस्तांतरणाला विरोध केला असल्याचे बोरवणकर यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये