ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

माजी आयपीएस मीरा बोरवणकरांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून अजित पवारांवर केले ‘हे’ गंभीर आरोप!

पुणे : (Meera Borwankar On Ajit Pawar) माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर पुस्तकांत अजित पवार यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. येरवड्यातील पोलिस स्टेशनच्या जमिनीचा लिलावाचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप मॅडम कमिशनर या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. मीरा बोरवणकर यांनी २०१० मधील प्रकरणाचा उल्लेख केला आहे.

पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले. तसेच आसपासच्या पोलिस ठाण्यातील गुन्ह्याचा आढावा घेतला. एक दिवस विभागीय आयुक्तांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की पुण्याचे पालकमंत्री तुमच्या बद्दल विचारत आहेत. त्यांना तुम्ही एकदा भेटा, असं त्यांनी मला सांगितल्याचं बोरवणकर पुस्तकात म्हणाल्यात.

येरवाडा पोलिस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील विषय असल्याचं त्यांनी मला सांगितलं. विभागीय कार्यालयात मी पालकमंत्र्याची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलिस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी सांगितलं की या जमिनीला लिलाव झाला आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्यासोबत जमीन हस्तांरणाची प्रक्रिया पार पाडावी, असं त्या पुस्तकात म्हणाल्या आहेत.

मी पालक मंत्र्यांना सांगितलं की येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार नाही, असा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे. यांसारखे आरोप बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर केले आहेत, त्यामुळे राजकारण तापू लागलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये