“कहीं अमृत, तो कहीं…”, हवामान खात्याच्या तज्ज्ञांचा शायराना अंदाज
पुणे | Maharashtra Rain Updates – गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं दमदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा तडाखा गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच कालपासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही पाऊस सक्रीय झाला आहे. या दरम्यान हवामान खात्याचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसणार असल्याचा इशारा दिला आहे. तसंच या अवकाळी पावसावर त्यांनी शायरी लिहिली आहे.
हवामान खात्याचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी अवकाळी पावसावर एक शायरी ट्विट केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “कहीं अमृत, तो कहीं.. बादलोंने उपर अंबरको दुल्हनसा सजा दिया, और मेरे शहर में बारीश की चार बुँदे गिरी, पर दुर कही गांव में उसका दिल शायद तेज़ धड़का, आँखों के समंदर में, फिर से पुरा खेत डुब गया |”, या शायरीतून होसाळीकर यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली आहे.
दरम्यान, या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवस हवामानातील गंभीर इशारे, काळजी घेण्याचा आणि आयएमडीच्या अपडेट्सकडे लक्ष देण्याचा सल्ला के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे.