राष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

अभियांत्रिकी कौशल्याने मेट्रोने गुणवत्ता कायम ठेवली : डॉ ब्रिजेश दीक्षित

अभियांत्रिकी कौशल्याने मेट्रोने गुणवत्ता कायम ठेवली : डॉ ब्रिजेश दीक्षित

पुणे : आठव्या इंडियन कन्स्ट्रक्शन चा उपक्रम आणि फर्स्ट कन्स्ट्रक्शन कॉउंसिल च्या वतीने आयोजित कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. बांधकाम, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी क्षेत्रात महत्वाचे योगदान करणाऱ्या कंपन्यांना हा पुरस्कार दिला जातो. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित त्यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.

दर वर्षी साजरा होणारा कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पुरस्कार प्रदान सोहळा शनिवारी मुंबई येथे संपन्न झाला. यंदा सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इअर अवनीश अवस्थी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार यांना प्रदान करण्यात आले.

कन्स्ट्रक्शन वर्ल्डमुळे एक चांगले व्यासपीठ सर्वांना प्राप्त झाले असून आणि आज इथे अनेक कंपन्या आहेत ज्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. पायाभूत सुविधा क्षेत्राशी संबंधी कामाबद्दल त्यांनी या सोहळ्याचे आयोजक कन्स्ट्रक्शन वर्ल्ड आणि फर्स्ट कन्स्ट्रक्शन कॉउंसिलचे देखील कौतुक केले

डॉ दीक्षित `कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इअर’ – या प्रतिष्ठित पुरस्काराचे २०२० मध्ये मानकरी होते. नागपूर आणि पुणे शहरात मेट्रो सेवा सुरु करण्याबद्दल आणि दळण वळणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल त्यांना हा पुरस्कार २०२० मध्ये देण्यात आला होता.

या प्रसंगी बोलताना, डॉ दीक्षित यांनी सांगितले, महा मेट्रोने नागपूर आणि पुणे येथे प्रकल्प राबवताना तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि आता सर्वत्र याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी कौशल्याचा वापर करत महा मेट्रोने फक्त वेळेची बचत केली नाही तर गुणवत्ता कायम राखत, प्रकल्पावर होणारा खर्च देखील कमी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये