पुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर

तापोळा : तापोळा हे महाबळेश्वरमधील अत्यंत सुंदर असे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणजे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. इथे असणार्‍या सर्व पर्यटनस्थळांपैकी हे पर्यटकांचे सर्वात जास्त आकर्षण ठरलेले तापोळा. टपोळीची ओळख ही मिनी काश्मीर म्हणून केली जाते.

तापोळा तलाव हे कोयचे शिवसागर जलाशयाचा शेवटचे ठिकाण आहे. हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. इथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. इथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो. सरासरी वार्षिक तापमान २१ डिग्री सेल्सिअस आहे. हिवाळ्यात तापमान १२ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जाते, तर उन्हाळ्यात ते ३३ डिग्री सेल्सिअसपर्यंत वर चढते. जवळचे शहर हे महाबळेश्वर आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये