पालकमंत्र्यांनी घेतला शहर पोलीस आयुक्तालयाचा आढावा

पुणे : जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. शहरातील नवीन पोलीस ठाण्यांच्या मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी या वेळी सांगितले. बैठकीस पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पोलिसांना आवश्यक सुविधांसाठी सहकार्य करण्यात येईल आणि महापालिकेकडील आवश्यक सुविधांसाठी संबंधितांना सूचना देण्यात येतील. वाहतूक पोलिसांसाठी आवश्यक मोटार सायकल खरेदीला निधी देण्यात येईल. पोलिसांनी शहरात त्वरित वाहतूक वॉर्डन नियुक्त करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी केल्या.

Dnyaneshwar: