फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया 450 धावा करणार! भारत 65 धावांत ढेर होणार? मिचेल मार्शची भविष्यवाणी
Mitchell Marsh on World Cup Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Final) यांच्यामध्ये रविवारी विश्वचषकाची फायनल रंगणार आहे. या सामन्याबाबत अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया आणि भाकित येत आहेत. ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने तर रोहित शर्मा आणि टीम इंडियाला थेट इशाराच दिला आहे. विश्वचषकात भारतीय संघाला फक्त 65 धावांवर ऑलआऊट करु, असे मिचेल मार्श याने म्हटलेय. त्यानंतर मार्शची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. दिल्ली कॅप्टिलच्या पॉडकॉस्टमध्ये बोलताना मिचेल मार्श याने एकप्रकारे टीम इंडियाला धमकी दिली आहे.
फायनलआधी मिशेल मार्श (Mitchell Marsh) याचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याने थेट फॉर्मात असणाऱ्या टीम इंडियालाच इशारा देत भविष्यवाणी केली आहे. विश्वचषकात भारतीय संघाला फक्त 65 धावांत ऑलआऊट करु, असे म्हटलेय. त्याचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या फायनलबाबत बोलताना मिचेल मार्श याने मोठा दावा केलाय. तो म्हणाला की, फायनलमध्ये आम्ही भारताचा पराभवा करु. भारताचा पराभव करत आम्ही अजेय राहू, असे मार्श म्हणाला. फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया दोन विकेटच्या मोबदल्यात 450 धावा करेल. प्रत्युत्तरदाखल टीम इंडिया फक्त 65 धावांत ऑलआऊट होईल.
मिचेल मार्श याने विश्वचषकात सरासरी कामगिरी केली आहे. त्याने एका शतकाच्या मदतीने 400 पेक्षा जास्त धावा केल्या. सेमीफायनलमध्ये मिचेल मार्श याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याला खातेही उघडता आले नाही. तरिही त्याने आत्मविश्वासाने ऑस्ट्रेलिया विश्वचषकावर नाव कोरेल, असे म्हटलेय.