ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

मिझोराम निकालाची तारीख बदलली, आता ३ डिसेंबरला नाही तर ‘या’ दिवशी होणार मतमोजणी

Mizoram Assembly Election Counting Date Changes : पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर संपूर्ण देश 3 डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा करत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने मिझोराममधील निकालाची तारीख बदलली आहे. आता येथे 3 डिसेंबर ऐवजी 4 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

“कमिशनला 3 डिसेंबर, 2023 (रविवार) पासून मतमोजणीची तारीख बदलून इतर आठवड्याच्या दिवसात बदल करण्याची विनंती करणारे अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत, कारण 3 डिसेंबर 2023 हा रविवार मिझोरामच्या लोकांसाठी विशेष महत्त्व आहे,” असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

मतदानापूर्वीच मिझोराममध्ये मतमोजणीची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली होती. यावर सर्व पक्षांचे एकमत होते. रविवार हा ख्रिश्चनांसाठी पवित्र दिवस असल्याचे मागणी करणाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ख्रिश्चन समाजाचे प्राबल्य असलेल्या मिझोराममधील मतमोजणीची तारीख बदलण्यात आली.

राजकीय पक्षांचे निवडणूक आयोगाला पत्र –
या मागणीबाबत सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले होते. या पत्रावर सर्व राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांच्या अध्यक्षांच्या सह्याही होत्या. रविवारी मिझोराममध्ये कोणताही अधिकृत कार्यक्रम आयोजित केला जात नाही, असे या पत्रात म्हटले आहे. 40 सदस्यीय मिझोरम विधानसभेसाठी 7 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये