जातीयतेच्या राजकारणात खरे ‘घसरले’

खरे यांची ‘समृद्धी ‘ कुठल्या मार्गावरून ?
‘त्या ‘ अधिकाऱ्याला अडचणीत आणू नका : नीटिजन्सचा सल्ला
पंढरपूर :
मोहोळ मतदार संघाचे आमदार राजू खरे यांनी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्यावर केलेल्या जातीयवादी आरोपानंतर ते वादामध्ये सापडले आहेत. ‘ पंढरपुरातील मालकशाही संपवू’ अशा प्रकारची भूमिका गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने मांडत आहेत. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या या भूमिकेचा अतिरेक करत त्यांनी परिचारक यांच्यावर जातीय टीका केली.
निधन पावलेल्या व्यक्तींवर खालच्या भाषेत केलेली टीका पंढरपूरकरांना आवडली नाही. याचा प्रतिनिधिक रोष व्यक्त करत परिचारक यांच्या कार्यकर्त्यांनी राजू खरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
वर्षांनुवर्षीची मोहोळ येथील राजन पाटील यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर राजू खरे हे सर्वसामान्यांचे आमदार म्हणून लोकाभिमुख होत होते. परंतु त्यांनी, मोहोळची मालकशाही संपवली तशी पंढरपूरची ही संपवू अशी अहंकाराची भाषा सुरू केली. याचा अतिरेक करत त्यांनी स्व. सुधाकर पंत परिचारक यांच्यावरच टीका केली. त्यामुळे परिचारक यांच्या सर्व धर्मीय नेत्यांनी एकत्रित येऊन त्यांच्याविरुद्ध रोष व्यक्त केला. केवळ परिचारक यांचे कार्यकर्तेच नव्हे तर अनेक सर्वसामान्य नागरिकांनी देखील राजू खरे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
त्यांच्यावर आता सोशल मीडियावरती टीका होत आहे. राजू खरे यांचा इतिहास अत्यंत काळा आहे. केवळ राजन पाटील आणि त्यांच्या दोन मुलांच्या विरोधातील नाराजीचा सूर म्हणून ते आमदार झाले. त्यामुळे खरे यांना अनपेक्षित लॉटरी लागली आहे, अशा प्रतिक्रिया अनेक नेटीजन्स यांनी व्यक्त केल्या. राजू खरे यांच्या श्रीमंतीचा महामार्ग कुठल्या ‘समृद्धीतून’ जातो हे आम्हाला माहित आहे, अकारण त्या वरच्या अधिकाऱ्याला अडचणीत आणू नका. असाही सल्लाही अनेकांनी सोशल मीडियावर खरे यांना दिला आहे
परिचारक यांच्या बद्दल कितीही राजकीय मतभेद असले तरी त्यांनी कधी ब्राह्मणवादाचे राजकारण केले असे त्यांचा शत्रू देखील म्हणणार नाही . किंबहुना मराठा, दलित, कोळी , धनगर आणि अल्पसंख्यांक व्यक्तींना त्यांनी सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते आपल्या सहकारी साखर कारखान्यावर प्रतिनिधित्व दिले त्यामुळे त्यांच्यावर ब्राह्मण्यतेचा आरोप लावता येणार नाही, अशाही अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
गेल्या सहा महिन्यात जे कमावलं ते बाष्कळ बडबडीने घालवू नका, असाही सल्ला त्यांना अनेकांनी दिला आहे. राजू खरे हा भ्रमाचा भोपळा आहे, त्याला टाचणी लागणे निश्चित होते. ती कधीतरी लागणार होती. ती लागली अशा उपासात्मक प्रतिक्रिया देखील काहींनी व्यक्त केली.
अभिजीत पाटील यांनाही सल्ला
अभिजीत पाटील यांना देखील या निमित्ताने सल्ला देत असताना निटीजंस ने म्हटले आहे की , ‘खरे हे मुळात शिवसेनेचे आहेत. राजकीय सोय म्हणून त्यांना राष्ट्रवादीने ते तिकीट दिले. ते कधीच शरद पवार यांचे नाहीत. ते शिंदे यांचेच कार्यकर्ते आहेत. कारण त्यांच्या पाहुण्याला उच्च पद दिले आणि त्याच्या माध्यमातून यांची ठेकेदारी चालली. त्यामुळे अभिजीत पाटील यांनी त्यांच्या नादी लागू नये, त्यांच्यासोबत कार्यक्रम घेऊ नये. असा सल्लाही एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने दिला आहे.