क्राईमताज्या बातम्या

ससूनच्या कॅन्टीनमध्ये ड्रग्जची विक्री, रुग्णालयातील प्रत्येकाला ललित पाटील पोहोचवायचा हप्ता – रवींद्र धंगेकर

पुणे | पुण्यातील ललित पाटील (Lalit Patil)ड्रग्ज प्रकरणात पुण्यातील आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातलं मंत्रीमंडळ ललित पाटीलला वाचवत आहे आणि ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर (Sanjiv Thakur) यांनादेखील सरकार वाचवत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकरांनी केला आहे. जर ललित पाटीलला शासन वाचवत असेल तर तर ही शासनाची आणि पुणे पोलिसांची नाचक्की आहे, असा हल्लाबोलदेखील त्यांनी केला आहे.

काय म्हणाले धंगेकर ?

रवींद्र धंगेकर यांची आज पुण्यातील पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे. ललित पाटील पलायन प्रकरणात अजूनही तपासात गती मिळालेली नाही. दोन दिवसांपूर्वीच मी पोलीस आयुक्त कार्यालयात गेलो होतो आणि तिथं देखील याबाबत पोलिसांशी चर्चा केली. शासन जो काही अहवाल देईल तो देईल. पण नऊ महिने ससून रुग्णालयात ललित पाटील असताना त्याने पोलीस, डॉक्टर तसेच हॉस्पिटल प्रशासन यांना ललित पाटील याने जे पैसे दिले होते, त्यांची चौकशी करावी. पण पोलीस प्रशासन सरकारच्या दबावखाली असून कोणताही तपास ससूनच्या बाबतीत करत नाही, असा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे.

तसेच आरोग्य विभागाकडून जी काही चौकशी समिती नेमण्यात आली होती त्याचा अहवाल देखील देण्यात आला असून अद्याप त्यावर देखील काहीच कारवाई करण्यात येत नाही. याचाच अर्थ असा की, शासन तसेच नेमण्यात आलेली समिती ही ससूनचे डीन डॉ.संजीव ठाकूर यांना अभय देत असल्याची टीका यावेळी धंगेकर यांनी केली. ससूनचे हॉस्पिटलचे डीन डॉ.संजीव ठाकूर आणि ललित पाटील यांनी मिळून ड्रग्ज विकलं आहे. हे मी सातत्याने बोलत आहे. तसेच ससूनच्या कॅन्टीन मधून हे सगळं व्यवहार सुरू होते. याबाबत पोलिसांना माहिती असूनही कोणतीही कारवाई होत नाहीये. याबाबत आत्ता पोलिसांनी डीन संजीव ठाकूर यांना अटक करावी अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये