ठाकरे गटाला मोठा झटका! आमदार रविंद्र वायकरांच्या घरी, ईडीच्या धाडी..
मुंबई : (MLA Ravindra Waikar ED Raid) आमदार रवींद्र वायकर यांच्या संबंधित विविध ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे हा आमदार अपात्रता निकालापुर्वीच ठाकरे गटाला मोठा झटका मानला जात आहे.. वायकर त्यांच्या भागिदारांच्या घरांवर आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकले असून, एकूण ७ ठिकाणी ईडीने धाड टाकली. जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत.
जोगेश्वरी येथे कराराचे उल्लंघन करून आलिशान हॉटेल बांधल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या वर्षी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) आमदार रवींद्र वायकर, त्यांची पत्नी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये वायकर आणि इतर आरोपींवर EOW ने विश्वासभंग, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा ईडीने दाखल केला आहे. त्यापार्श्वभुमीवर (मंगळवार) दि. 8 जानेवारी रोजी सकाळी ईडीच्या पथकाने विकारच्या घरावर छापा टाकला. ईडीच्या या टीममध्ये 10 ते 12 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, ईडीचे पथक सकाळी साडेआठच्या सुमारास विकारच्या घरी पोहोचले. यानंतर ईडी वायकर यांच्या घराची झडती घेत आहे.