‘…सगळं ओके मधी हाय’ म्हणणारे शहाजीबापू पाटील आमदार निवासातल्या अपघातात थोडक्यात बचावले

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर गुवाहाटीत असताना त्यांच्यासोबत असलेले सांगोल्याचे आमदार शहजीबापू पाटील यांचा एक डायलॉग सोशल मिडीआवर व्हायरल झाला होता. ‘काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ती हाटील, एकदम ओके मध्ये हाय सगळं’ हा त्यांचा डायलॉग नेट नेटकऱ्यांनी खूपच उचलून धरला होता. सत्तांतर झाल्यानंतरही शहाजीबापू पाटील यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मात्र आज आकाशवाणी आमदार निवासामध्ये पाटील राहत असलेल्या ठिकाणी अपघात घडला मात्र पाटील सुदैवाने थोडक्यात बचावले.
मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील पाटील यांच्या रुमच्या छताचा काही भाग कोसाल्यालायची घटना घडली आहे. सुदैवाने पाटील या घटनेत थोडक्यात वाचले. घटनेनंतर रूमचे फोटो देखील समोर आलेले आहेत. सगळं ओके मधी हाय म्हणणाऱ्या शहाजीबापू पाटील यांचीच खोली ओके मधी नसल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान, शहाजी बापू पाटील गुवाहाटीहून परतल्यानंतर गावी गेले असता त्याचं मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांच्या आजूबाजूला जे दोन चार लोक आहेत त्यांच्यामुळेच आम्ही बंड केलं आसल्याचं त्यांनी सांगितलं होतं.