ताज्या बातम्यारणधुमाळी
मनसे नेते महेंद्र भानुशाली यांना अटक

मुंबई : उद्या (बुधवार) राज्यभरात मनसेनं मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरवात केली आहे. मुंबई पोलिसांनी मनसे नेते महेंद्र भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक केली आहे. तसंच पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून भोंगे जप्त केले आहेत. सोबतच हनुमान चालिसा पठण करण्यासाठीचं साहित्यदेखील जप्त केलं आहे.
महेंद्र भानुशाली घाटकोपरमधील चांदिवली मतदारसंघात मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत. पोलिसांनी आता त्यांना अटक केली असून त्यांच्या कार्यालयातील भोंगे ताब्यात घेतले आहेत. तसंच उद्याच्या आंदोलनासाठी जमा केलेलं साहित्य देखील जप्त केलं आहे.