ताज्या बातम्यापुणे

“आमची पोरं फटाके विकत आहे, गांजा नाही…” वसंत मोरे सरकारवर संतापले

पुणे | पुण्यातील मनसे (MNS) नेते वसंत मोरे (Vasant More MNS) यांनी पुन्हा एकादा सोशल मीडियाचा माध्यमातून सरकारला खडेबोल सुनावले आहेत. त्यात त्यांनी आमची पोरं फटाके विकत आहे, गांजा नाही…आमची दिवाळी नीट झाली नाही तर तुमचा रोज शिमगा होईल,असा थेट इशारा पुणे पोलिस आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. अतिक्रमणे वाले एवढे मागतात, पोलिस तेवढे मागतात, ट्रॅफिक वाले एवढे मागतात… अशा तक्रारी आल्यानंतर वसंत मोरे यांनी हा इशारा दिला.(Pune News)

वसंत मोरे नेमकं काय म्हटले ?

वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्या माध्यमातून रस्त्यावर दिवाळीचा व्यवसाय करणाऱ्यांची व्यथा मांडली आहे. “आयका ना साहेब…. (अतिक्रमणवाले आणि पोलिस)” या शिषर्काखाली वसंत मोरे यांनी पोस्ट लिहिली. त्यात वसंत मोरे यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे यापूर्वीच सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे. अजून ते पूर्णपणे त्यातून सावरले नाही. दिवाळी वर्षातून एकदाच येते. परंतु राज्य सरकार अस्थिर असल्यामुळे कोणाचाच कोणाला मागमूस राहिला नाही. यामुळे सामान्य जनतेकडे कोणाचेच लक्ष नाही. दिवाळीत (Diwali 2023) चार दिवस आमची तरुण पोरं रस्त्याच्या कडेला कोणाला अडचण होणार नाही याची काळजी घेऊन फटाक्यांचे स्टॉल लावून बसलेले आहेत. या पोरांना व्याजाने पैसे आणून चार पैसे मिळतील, या आशेने हे स्टॉल लावले आहे.

पोलीस, अतिक्रमणवाल्यांचा त्रास

वसंत मोरे यांच्याकडे या मुलांनी तक्रारी केल्या. अतिक्रमण वाले, पोलीसवाले, ट्रॅफिक वाले पैसे मागतात…त्यावर वसंत मोरे संतापले. त्यांनी सरळ इशारा दिला. अरे आमची पोर फटाके विकत आहेत, गांजा नाही. पोरांना धंदे करू द्या…त्यांची दिवाळी 4 दिवसांचीच आहे…तुमची दिवाळी उरलेले 365 दिवस चालते…आमची दिवाळी नीट झाली नाही तर तुमचा रोज शिमगा होईल… नाहीतर एका दिवसात सगळे लाईव्ह घेऊन कोणी किती घेतले ते जाहीरपणे सांगावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये