ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुलुंड टोलनाक्यावर जाळपोळ; मात्र केबिन पेटवणारे कोण? हे अद्याप अस्पष्ट

मुंबई | टोल बंद करण्यासाठी मनसेने (MNS) आतापर्यंत अनेक आंदोलने करून अधिकृत आणि अनधिकृत असे 67 टोलनाके बंद केले. शिवसेना भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला. दरम्यान राज ठाकरे यांनी टोलनाके जाळण्याचा इशारा दिला आणि मुलुंडमध्ये टोलनाक्यावरील (Mulund Toll Plaza) केबिन पेटवण्यात आल्याची घटना घडली. परंतू केबिन पेटवणारा व्यक्ती कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये टोलनाक्याच्या केबिनमध्ये एक व्यक्ती 3 टायर घेऊन येतो. नंतर खिशातून पेट्रोलनं भरलेली बाटली काढतो आणि टायरवर पेट्रोल टाकून टायर पेटवतो. केबिनमध्ये आग लागताच हा व्यक्ती निघून जाताना दारही लावून जातो. केबिन कशाप्रकारे जाळण्यात आली हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. ही घटना राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर 3 वाजून 45 मिनिटांनी घडली. केबिन जाळल्याच्या घटनेनंतर आता मुलुंड टोलनाक्यावर मुंबई पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.

राज ठाकरेंच्या जाळपोळीच्या इशाऱ्यानंतर, पहिली घटना मुलुंडमध्ये घडली आता ही केबिन पेटवणारे नेमके कोण आहेत, याचा शोध सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये