ताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

“ही कीड समूळ नष्टच करा, यातच हिंदुस्तानचं हित”; पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीवरून राज ठाकरे संतापले

पुणे : पुण्यात शुक्रवारी सायंकाळी केंद्रीय तपास यंत्रणा (NIA) कडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) वरील कारवाई दरम्यान काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं. या कारवाईनंतर मुस्लीम समाजातील काही लोकांनी पुणे कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन केले.

दरम्यान, या आंदोलनात काही लोकांकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘अल्लाह हु अकबर’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून गुन्हेगारांवर कारवाई करायला सुरु असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

पुण्यातील या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले आहेत. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला ‘असेच चालणार असेल तर यांना हिंदुस्तानातून मुळापासून संपवून टाकले पाहिजे’ असा इशारा दिला आहे. “माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे.” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यांनी एक पत्रक देखील शेअर केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये