रणधुमाळी

जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकावर बंदीसाठी पुरंदरेंनी लिहिलेलं पत्र मनसेनं आणलं समोर

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांवर जेम्स लेन या लेखकाने लिहिलेल्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ऑक्सफर्ड प्रकाशनाला एक पत्र लिहून पाठवलं होतं. ते पत्र मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आता माध्यमांसमोर आणलं आहे. त्यावरून शरद पवारांना पुरंदरेंची भूमिका माहिती नव्हती का? असा प्रश्न मनसेनं विचारला आहे.

राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीवाद वाढवल्याचा आरोप केला होता. त्यावर शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंच्या आरोपाला उत्तर दिल होतं. यामध्ये जेम्स लेनला पुस्तक लिहायला बाबासाहेब पुरंदरेंनी मदत केल्याच्या कथित आरोपाचं समर्थन त्यांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर मनसेचे संदीप देशपांडे यांनी पुरंदरेंनी जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी आणण्यासाठी लिहिलेलं पत्रच पुढं आणत पुरंदरेंवरील आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.

देशपांडे यांनी म्हटलं आहे की, “नोव्हेंबर २००३ मध्ये पुरंदरेंनी दिल्लीतील ऑक्सफर्ड प्रकाशनाला हे पत्र लिहिलं होतं. या पत्रावर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह सहा मान्यवरांच्या सह्या आहेत. यामध्ये निनाद बेडेकर, डॉ. वसंतराव मोरे, डॉ. जी. बी. मेहेंदळे, डॉ. सदाशिव शिवदे, डॉ. जयसिंग पवार आणि तत्काळीन खासदार प्रदीप रावत यांच्या सह्या आहेत” २००३ मध्ये शरद पवार हे सत्तेत होते, तेव्हा त्यांना हे पत्र माहिती नव्हतं का? असा सवाल करत देशपांडे यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये