क्राईमताज्या बातम्यादेश - विदेश

नात्याला काळीमा फासणारी घटना! मोबाईल घेण्यास रोखल्याने, मुलाचा आईवर जिवघेणा हल्ला

Mobile Addiction Crime News : सध्याच्या काळात मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोठ्या माणसांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येकाच्या हाती मोबाईल आले आहेत. अगदी केजीपासून मुलांच्या हातात मोबाईल आणि आता मोबाईलची सवयच झाली आहे. हातात मोबाईल असल्याशिवाय मुलं जेवायलाच बघत नाही. टिव्हीवर कार्टुन बघणं, गाणी ऐकणं, मैदानावर खेळ खेळणं हे आता मागे पडत चाललं आहे. पण मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलं त्याच्या अधीन गेलीत.

मोबाईल हातात नसला की मुलं बैचेन व्हायला लागली आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्याने एका मुलाने आपल्या आईवरच हल्ला केला. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. ही केवळ एक बातमी नाहीए, तर आपल्या प्रत्येकाला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. मुलांच्या हातात मोबाईल देऊन आपण आपल्या कामात व्यस्त होऊन जातो. पण मोबाईलचा विळखा मुलांच्या आयुष्यावर घट्ट होत चालला आहे याचं हे एक उदाहरण आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

केरळमधल्या कन्नूर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. इथल्या कनिचिरा गावात राहणारी 63 वर्षांची रुक्मिणी नावाची महिला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णलयात दाखल होती. गेल्या एक आठवड्यापासून रुक्मिमीवर उपचार सुरु होते. पण शनिवारी तिची मृत्यूची झुंज संपली. रुक्मिणीच्या मृत्यूचं कारण ठरलं मुलाचं मोबाईल व्यसन. रुक्मिणी यांचा मुलगा सुजीत याला मोबाईलचं व्यसन जडलं होतं. दिवसरात्र तो मोबाईलमध्ये गुंतलेला असायचा. याच गोष्टीवरुन रुक्मिणी त्याला ओरडायच्या. घटनेच्या दिवशीही सुजीत मोबाईलमध्ये गेम खेळत होता. त्याला मोबाईल घेण्यापासून रोखण्याने त्याने हा हल्ला केला. त्यामुध्ये जन्मदातीची मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये