मोदी सरकारने भारताच्या युवा वर्गाचे भविष्य हिरावले, राहुल गांधींची टीका

उदयपूर : काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी आज उदयपूर येथील काँग्रेस पक्षाच्या नव संकल्प चिंतन शिबीरात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सरकारने भारताच्या युवा वर्गाचे भविष्य हिरावलेआहे, अशी टीका यांनी नरेंद्र मोदी सरकारवर केली आहे. एकीकडे बेरोजगारी, दुसरीकडे महागाई, युक्रेनमध्ये युद्ध झाले आहे. आगामी काळात चलनवाढीवरही त्याचा परिणाम होईल.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, आता काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे, की ऑक्टोबर महिन्यात पूर्ण काॅंग्रेस पक्ष हा जनतेमध्ये जाऊन दौरा करणार आहे, या शब्दात त्यांनी भविष्यातील पक्षाचे धोरण सांगितले. जनतेचे जे नाते काँग्रेसशी होते, ते पुन्हा नव्याने स्थापित केले जाईल. हे शाॅर्टकटने होणार नाही. त्यासाठी घाम गाळूनच काम करावे लागेल, असा सल्ला राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.
आपल्याला विचार न करता जनतेत जाऊन बसावे लागेल. त्यातून त्यांच्या समस्या कळतील व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपले जनतेबरोबर जे कनेक्शन होते ते पुन्हा बनवावे लागेल. जनता जाणून आहे, की काँग्रेस पक्षच देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.