‘मैं हूं चौकीदार’ नंतर आता ‘मोदी का परिवार’, भाजपच्या प्रचाराची नवी मोहीम सुरु!
Modi Ka Parivar : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासह भाजपच्या (BJP) अनेक बड्या नेत्यांनी व मंत्र्यांनी सोमवारी अचानक सोशल मीडिया प्रोफाइलच्या बायोमधील माहिती अपडेट स्वतःच्या नावाच्या समोर ‘मोदी का परिवार’ असा शब्द जोडला आहे. (Modi Ka Parivar)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तेलंगणामध्ये सभेत राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. माझ्या कुटुंबावरुन माझ्यावर निशाणा साधला जात आहे. मात्र आता संपूर्ण देश सांगतोय की मी मोदीच्या कुटुंबातील आहे. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर आता अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावात बदल करत त्यामध्ये मोदींच्या नावाचा समावेश केला आहे.
काय म्हणाले होते लालू यादव
रविवारी पाटण्यात आयोजित इंडिया आघाडीच्या सभेत बोलताना बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव पंतप्रधान मोदींवर व्यक्तिगत टीका केली होती.”कोण आहेत मोदी? मोदी कोणीच नाही. मोदींकडे तर त्यांचं कुटुंबही नाही. तुमच्या कुटुंबात कोणतंही मूल का नाही? जास्त मुलं असलेल्यांना बोलतात की परिवारवाद करतात. कुटुंबासाठी लढतात, मोदीतर हिंदूच नाही, असं लालू प्रसाद यादव म्हणाले होते.
यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि मंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या नावापुढे तीन अक्षरं जोडली आहेत. “मोदी का परिवार” असं लिहिलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेत्यांकडून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या नावामध्ये बदल केला आहे.
मोदी म्हणाले की, १४० कोटी देशवासीय माझे कुटूंब आहे. हे तरुण माझे कुटूंब आहे. देशातील कोट्यवधी मुली, माता व भगिनी माझे कुटूंब आहे. देशातील प्रत्येक गरीब माझे कुटूंब आहे. ज्यांचे कोणी नाही ते मोदीचे आहेत आणि मोदी त्यांचा आहे. हा भारतच माझे कुटूंब आहे.