ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…तर 2024 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

मुंबई | Prakash Ambedkar – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “जर मुस्लीम समुदायानं साथ दिली, तर 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत,” असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ते मुंबईत मुस्लीम मौलवी आणि उलमा यांच्यासोबतच्या बैठकीत बोलत होते.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “जर मुस्लीम समुदायानं साथ दिली, तर 2024 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. हे तुम्ही लिहून ठेवा. मुस्लिमांची ही ताकद आहे. यावेळी मुस्लिमांमधून बदलाची लाट येईल. भाजपला (BJP) 2024 मध्ये मुस्लिम समाज कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही हा सर्वांना विश्वास आहे.”

“देशात धार्मिक तेढ वाढवणारी आणि सामाजिक शांतता भंग करणारी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे मुस्लीम मौलवी आणि उलमा यांच्याबरोबर महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये ‘मुस्लीम समाजाची सध्याच्या राजकीय व्यवस्थेतील पिळवणूक, मूलभूत समस्या आणि संवैधानिक उपाय’ या अनुषंगानं उपस्थितांशी संवाद साधला. तसंच पैगंबर बिल संदर्भातही चर्चा झाली,” अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये