गुजरातच्या सोमनाथ मंदिराबद्दल ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांचं वादग्रस्त विधान
Controversial Statement : ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष तथा मुस्लीम धर्मगुरु मौलाना मोहम्मद साजिद रशीदी (Maulana Mohammad Sajid Rashidi) हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. रशीदी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलय. गुजरातमधील सोमनाथ मंदिरची लूट करून मोहम्मद गझनीने कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचे ते म्हणाले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
यापूर्वी सुद्धा त्यांनी राम मंदिराबाबत वादग्रस्त विधान केलं होते. आमच्या भावी पिढ्या राम मंदिर पाडून मशीद बांधतील. आज मुस्लीम शांत आहेत. मात्र, येत्या काळात इतिहास लिहिला जाईल, असं ते म्हणाले होते. यावेळी पण त्यांनी गुजरात मधील सोमनाथ मंदिराबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.
काय म्हणाले मोहम्मद साजिद रशीदी ?
मोहम्मद साजिद रशीदी (Maulana Mohammad Sajid Rashidi) म्हणाले, 800 वर्षांच्या मुघल साम्राज्यात अनेक बादशाहा होऊन गेलेत. त्यांचा इतिहास वाचला तर त्यांचा धर्माशी काहीही संबंध नव्हता, हे सर्वांना दिसून येईल. त्यांनी धर्माच्या नावावर कोणतंही काम केलं नाही. अशी अनेक उदाहरणं देता येईल. मोहम्मद गझनीबद्दल लोकं म्हणतात, की त्याने सोमनाथ मंदिर तोडले. मात्र, इतिहास असं सांगतो की तेथील काही लोकांनी आस्थेच्या नावावर गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार गझनीकडे केली होती. त्यानंतर गझनीने मंदिर परिसराची पाहणी केली. जेव्हा त्याला लोकांची तक्रारी खऱ्या आहेत, याची खात्री पटली, तेव्हा त्याने सोमनाथ मंदिरावर हल्ला केला. सोमनाथ मंदिर तोडून त्याने कोणतीही चूक केली नाही. गझनीने तिथे होणाऱ्या गैरकृत्यांना आळा घालण्याचं काम केलं, अशी प्रतिक्रिया रशीदी यांनी त्यावेळी दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे.