“तो चांगला खेळला तर पैसे कमावेल अन्…”, मोहम्मद शमीच्या पत्नीचं संतापजनक वक्तव्य; व्हिडीओ व्हायरल
Mohammed Shami | भारतीय संघाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आपली ताकद संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे. मोहम्मद शमीनं वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यानी तीन सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे सध्या शमीच्या या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे शमी चांगलाच चर्चेत आला आहे. तर आता तो त्याच्या वैयक्तीक आयुष्यामुळे देखील चर्चेत आला आहे.
मोहम्मद शमीच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही सुरळीत नाहीये. कारण शमीची पत्नी हसीन जहाँनं (Hasin Jahan) त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. अशातच आता हसीन जहाँचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हसीन जहाँ मोहम्मद शमीच्या खेळीवर आणि त्याच्या पैशाबाबत बोलताना दिसत आहे.
हसीन जहाँनं म्हटलं आहे की, मी क्रिकेट पाहत नाही. मी कोणत्याही खेळाडूची फॅन नाहीये ना क्रिकेटची फॅन नाही. शमीनं किती विकेट घेतल्या हे माझ्या समजण्याच्यापलीकडे आहे. कारण मला याबाबत काही माहिती नाही. पण काहीही असो तो जर चांगला खेळत आहे म्हणजे तो संघातील आपली जागा कायम ठेवेल. चांगला खेळला तर चांगेल पैसे कमावेल म्हणजे आमचं भविष्य सुरक्षित होईल. तसंच मी टीम इंडियाला बेस्ट विशेश देईन पण त्याला देणार नाही.
हसीन जहाँचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी हसीन जहाँवर संताप व्यक्त केला असून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे.