“सॉरी ब्रदर, इट्स कॉल…” शोयब अख्तरला टॅग केलेल्या ट्विटमधून मोहम्मद शमीला म्हणायचंय काय?

नवी दिल्ली : (ICCT20WORLDCUP2022) बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि सॅम करनच्या (Sam Curran) दमदार खेळीने इंग्लंडने टी 20 वर्ल्ड कप 2022 इंग्लंड संघाच्या नावे केला आहे. पाच विकेट्सनी इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. सेमी फायनल सामना भारत विरुद्ध इंग्लंड झाला होता. सर्वांना फायनलचा सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये व्हावा अशी अपेक्षा होती. मात्र, इंग्लंड विरोधात भारताला हार पत्करावी लागली होती. तरी शेवटच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते.
दरम्यान, या आधीच्या सामन्यांत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोयब अख्तर याने भारतीय संघावर अनेकदा टीका केली होती. मात्र, फायनलचा सामना पाकिस्तानने हरल्यानंतर शोयब अख्तरला भारतातीय खेळाडू मोहम्मद शमी याने चांगलीच प्रतिक्रिया दिली आहे. सामना हरल्यानंतर शोयब अख्तरने तुटलेल्या हृदयाची 💔 इमोजी ट्विट केली होती. त्यावर शमीने “sorry brother… its call Karma 💔💔💔” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शमीच्या या ट्विटवरून क्रिकेट जगात चर्चांना उधाण आलं आहे. अनेक भारतीय क्रिकेटप्रेमी शमीच्या बाजूने ट्विट करत आहेत तर पाकिस्तानच्या संघाचे चाहते शोयब अख्तरच्या बाजूने ट्विट करत आहेत.