ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

‘कचरा सेठ’ म्हणत, मोहित कंबोजांचा मलिकांवर निशाणा; म्हणाले, “त्यांना आर्थर रोड तुरुंगात…”

मुंबई : (Mohit Kamboj On Nawab Malik) राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे शरद पवार यांच्या ‘तळ्यात’ आहेत, की सत्तेत सहभागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘मळ्यात’, या प्रश्नाचं उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांवर ‘लेटर बॅाम्ब’ टाकत मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास विरोध केला होता. फडणवीसांच्या पत्रानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी ‘एक्स’वरुन बॉम्ब टाकला आहे.

‘नवाब मलिक यांचा जामीन सुप्रीम कोर्टान रद्द करावा. आजारपणाच्या कारणास्तव घेतलेला जामीन रद्द करण्यात यावा. ‘कचरा सेठ’ची तब्येत एकदम फर्स्ट क्लास दिसत आहे, कचरा सेठला कोणत्याही उपचाराची गरज नाही, नागपुरात विधिमंडळाच्या अधिवेशनाला हजेरी लावायला नवाब मलिक यांना जामीन मिळालेला नाही. मिया मलिकला तात्काळ ऑर्थर रोड जेलला पाठवावे’ असे ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज यांनी ‘एक्स’वरुन केले आहे.

नवाब मलिक जेल जायेंगे, अशी सर्वात आधी भविष्यवाणी करणाऱ्या मोहित कंबोज यांनी फडणवीसांच्या पाठोपाठ सोशल मीडिया पोस्ट केल्याने चर्चेला उधाण आले आहे. नवाब मलिक यांची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानातील एंट्री चांगलीच गाजत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते थेट सत्तापक्षाच्या बाकांवर विराजमान झालेले दिसले. त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांना तूर्तास महायुतीत घेऊ नये, असे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिले. या संपूर्ण घटनाक्रमावर मलिक यांनी मौन बाळगले असले तरी महायुतीतील नेते सध्या बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये