राज्यात पुन्हा मॉन्सून सक्रिय होणार
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात नैर्ऋत्य मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना आज (शनिवारी) मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे. तर मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असतानाच मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे कायम असून राजस्थानच्या जैसलमेर पासून कोटा, गुना, सागर, रायपूर, पुरी ते कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे. तर कच्छ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.
राज्यात कसे असणार पावसाचे अलर्ट
रेड अलर्ट –
रत्नागिरी, भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर
ऑरेंज अलर्ट –
ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली
येलो अलर्ट-
मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, भंडारा, गोंदिया
त्यामुळे नागरिकांनी पर्यटन करताना किंवा कामानिमीत्त बाहेर पडताना पावसाचा अंदाज घेवून योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.