ताज्या बातम्या

मुख्यमंत्री साहेब, माझ्या श्रीकांतला आमदार करा, मग… शिंदेंना आलेले हे पत्र कुणी लिहिले 

बीड | आपल्या मुलाला आमदार करा, अशी मागणी करून बीड जिल्ह्यातल्या एका आईने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. महिलेने लिहिलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलचं चर्चेत आहे.

बीड जिल्ह्यातील दहिफळ गावातील सागराबाई विष्णू गदळे या मातेने मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे. आपल्या मुलाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बनवावं, असा आशयाचं पत्र त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाने मंत्रालयात पाठवलं आहे. याआधी देखील श्रीकांत गदळे यांनी शंभर रुपयाच्या बॉण्डवर मला आमदार केल्यानंतर मी एक रुपया मानधन घेऊन काम करेल अशा आशयाचा बोर्डवर लिहिलेलं पत्र राज्यपालांना लिहिलं होतं. त्याआधी श्रीकांतने एक दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याची देखील इच्छा व्यक्त केली होती, त्यावेळेस देखील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या दहिफळ या गावातील श्रीकांत महाराष्ट्रभर चांगलाच गाजला होता.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सागराबाई म्हणतात की, माझ्या श्रीकांतने आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक कामं केली आहेत, मात्र काही कामं करण्यासाठी पद नसल्यामुळे अनेक अडचणी त्याला येता असतात. माझ्या श्रीकांतला आमदार बनवा तो एक रुपया मानधनावर काम करण्यासाठी तयार आहे. आमदार बनवल्यानंतर माझा श्रीकांत हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा रोखायच्या, शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवायची, बेरोजगार तरुणांचे प्रश्न मार्गी लावायचे, हे दाखवून देईल.

Untitled design 52

हे पत्र सध्या सोशल मीडियावर वायरल होत असून, या पत्राची सर्वत्र चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये