ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

पालिकेत बोगस ओळखपत्राची चलती, 175 बोगस ओळखपत्रे जप्त

पुणे | Pune News – गेल्या आठ दिवसांत 175 बोगस ओळखपत्रे जप्त केली आहेत. हे ओळखपत्र घालून महापालिकेत फिरणाऱ्यांना तंबी देऊन सोडून देण्यात आले आहे. महापालिकेच्या कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सारखी ओळखपत्र तयार एजंट, कार्यकर्ते थेट इमारतीमध्ये प्रवेश करत आहेत. त्याच आधारे ठेकेदाराच्या फाइल मार्गी लावण्यासाठी काम केले जात आहे. त्याविरोधात प्रशासनाने बोगस ओळखपत्र जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे.

ओळखपत्रावर महापालिकेचा लोगो असलेली लेस व नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे हे महापालिकेच्या कायम सेवेत असलेले कर्मचारी असावेत असा भास निर्माण होतो. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित ठेकेदाराकडून ओळखपत्र देणे गरजेचे आहे. त्यावर त्याचे पद, कालावधी, विभाग याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्‍यक आहे. पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी असे कर्मचारी, एजंटावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांना त्यांच्या ठेकेदाराने ओळखपत्र देणे गरजेचे आहे. इतर नागरिक बनावट ओळखपत्र घालून येत आहे. अशांवर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार १७५ ओळखपत्र जप्त केले आहेत. यापुढे कायदेशीर कारवाई केली जाईल.’

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये