पिंपरी चिंचवडपुणे

बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

बदलापूर येथे दोन लहान चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज (बुधवारी) आंदोलन केले. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली.

संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयासमोर झालेल्या आंदोलनात शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, गणेश भोंडवे, सुलक्षणा शिलवंत धर, प्रियंका बारसे, विनायक रणसुभे, नंदकुमार शिंदे तसेच डॉक्टर अभय तांबिले, संतोष कवडे, प्रशांत सपकाळ, कविता कोंडे, अनिल भोसले, संदीप चव्हाण, गणेश काळे, सागर चिंचवडे, संजय पडवळ , धम्मराज साळवे, श्रीमंत जगताप , हेमंत बलकवडे, वंदना आराख, मनीषा शेळके , मोहम्मद सय्यद, लता सूर्यवंशी, राजेश रोजचीरामणी, सचिन गायकवाड, गणेश भांडवलकर, काशिनाथ जगताप व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बदलापूर येथे दोन लहान चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ, कोलकाता येथील महिला डॉक्टर भगिनीवर झालेल्या अत्याचारा विरोधात व उरण येथे घडलेल्या हत्याकांडा विरोधात मूक मोर्चा तसेच निषेधाचीची स्वाक्षरी अभियान आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष कामठे म्हणाले, “अकार्यक्षम गृहमंत्री हे पक्ष फोडण्यामध्ये, घर फोडण्यामध्ये तसेच संपूर्ण वेळ प्रचारामध्ये व्यस्त असल्याकारणाने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत त्यांना गांभीर्य उरलेले दिसून येत नाही.कधी नव्हे तो एवढा कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाला संपूर्ण वेळ सरकारी खर्चावर चाललेल्या प्रचारासाठी सत्तेतील नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचे काम दिले आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये