MP मध्ये नाराजीचा सुर? चौथ्या केंद्रीय मंत्र्यासाठी परतीचे संतेक; ‘या’ दिग्गजांना उतरवले विधानसभेच्या मैदानात..
भोपाळ : (MP Assembly Election 2023) मध्यप्रदेशात सध्या निवडणुकांचे वारे जोरात वाहात आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मध्यप्रदेश भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. पक्षाच्या तिसऱ्या यादीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना (Jyotiraditya Scindia) तिकीट दिले जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सुर उमटण्याची दाट शक्यता आहे.
निवडणुकीत तिकिट नाकारल्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात येते. परंतु सध्या मध्यप्रदेशमध्ये तिकिट मिळाली की नाराजी असा वेगळाच पॅटर्न सध्या मध्यप्रदेशमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे केंद्रीय मंत्री असलेल्या तिघांना भाजप पक्षश्रेष्ठीने विधानसभा निवडणुकांच्या मैदानात उतरले आहे. त्यामुळे या मंत्र्यांसाठी हे परतीचे दोर असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राज्यात नाराजीचा सुर उमटला जाण्याचा अंदाज आहे. मालिकेत आता आणखी एका नवाची भर पडण्याची शक्यता आहे.
मध्यप्रदेशात कृषीमंत्री मंत्री नरेश तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, फग्गनसिंह कुलस्ते या तीन केंद्रीय मंत्र्यांना भाजपने विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. याच पद्धतीने आता ज्योतिरादित्य शिंदे यांना उतरवले जाणार का? तिसऱ्या यादीत त्यांचे नाव असणार का? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
तिसऱ्या यादीत ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव येण्याचे कारण म्हणजे शिवपुरी मतदारसंघातून अनेकदा आमदार राहिलेल्या शिंदेंच्या आत्या यशोधरा राजे या प्रकृतीच्या कारणामुळे यंदा निवडणूक लढवण्यास इच्छूक नाहीयेत, त्यामुळे त्यांच्या जागी ज्योतिरादित्य यांना निवडणुकीला उभं केलं जाऊ शकतं.